परिचय

  • वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत.

  • सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयातून २००१ साली बीएएमएस हि पदवी संपादन केली.

  • लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात.

  • आहारा या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे.

  • त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.